126 स्वाईन फ्लू लस स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी भारतात तयार करण्यात आलेली स्वेदशी लस प्रासंगिक लेखांत भारतात तयार करण्यात येणार्‍या स्वेदशी स्वाईन फ्लू लसी, मानव आणि प्राणि यांवर वापरण्यात येणार्‍या लसी, लसीची कमतरता/अनुपलब्धता दूर करण्यासाठी केलेली व्यवस्था, आणि जीव वाचवण्यात लसींची भूमिका या संबंधी माहिती असली पाहिजे. 127 दुर्मिळ अंतरिक्षीय घटना दुर्मिळ सौरग्रहण, चंद्रग्रहण, उल्कापात, पृथ्वी संबंधी तार्‍यांच्या जागेमध्ये होणारे बदल याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत या घटनां संबंधी लोकांच्या उलट प्रतिक्रिया असल्या पाहिजेत. या घटना दुर्मिळ का आहेत त्यांची कारणे, आणि ज्योतिषतज्ञ व वैज्ञानिक ह्यांच्यामधील मतभेद हे प्रासंगिक आहेत. अंतराळयान, पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचे अस्तित्व हे अप्रासंगिक आहेत आणि अंतराळ संशोधनावरील माहिती ही अप्रासंगिक आहे. दु्र्मिळ घटनांचे केलेले वर्णन एवढे महत्त्वाचे नाही. 128 गोध्रा ट्रेन आक्रमण गोध्रामध्ये साबरमती जलद ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारातील मृतांची किंवा जखमींची संख्या प्रासंगिक लेखांत गोध्रामध्ये साबरमती जलद ट्रेनमध्ये झालेल्या आक्रमणात मृतांची किंवा जखमींची संख्या, आणि दिलेल्या अहवालामधील आकड्यांशी संबंधित असलेले मतभेद याविषयी माहिती असली पाहिजे. 129 मायकल जॅक्सनचा अकाली मृत्यू मायकल जॅक्सनच्या अकाली मृत्यूशी संबंधित असलेले गूढ प्रासंगिक लेखांत मायकल जॅक्सनच्या मृत्यूचे संभाव्य कारणांचा समावेश असला पाहिजे. ज्या लेखांमध्ये फक्त जॅक्सनच्या मृ्त्यूचा अहवाल दिला गेला आहे, किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचे वर्णन केले गेले आहे असे सर्व लेख अप्रासंगिक मानल्या जातील. 130 पेट्रिलिअम पदार्थांच्या किमतीत अचानक भरमसाठ वाढ पेट्रिलिअम पदार्थांच्या किमतीत अचानक भरमसाठ वाढी संबंधी असलेले मतभेद (वादविवाद) प्रासंगिक लेखांत किमतीत अचानक झालेल्या भरमसाठ वाढीशी संबंधित असलेले सरकारचे वादविवाद (मतभेद) आणि सरकारने घेतलेल्या निर्णयावर कडक टीका यांचा उल्लेख असावा. 131 पत्रकारांचे अपहरण आणि त्यांची हत्या व्यावसायिक धोके (अडथळे) निर्माण होत असल्या कारणाने पत्रकारांचे अपहरण आणि त्यांची हत्या प्रासंगिक लेखांत पत्रकारांचे अपहरण आणि त्यांची हत्या आणि अपहरणा मागची कारणे याविषयी माहिती असली पाहिजे. अपहरणकर्ते, अशा गुन्ह्यां संबंधी लोकांच्या भूमिका याविषयी माहिती, आणि दहशतवादी संघटनांचा सहभाग या लेखांत महत्त्वाचा (प्रासंगिक) आहे. या घटनांची चौकशी आणि दोषींना मिळालेली शिक्षा ही प्रासंगिक माहितीसुद्धा लेखांत पाहिजे. 132 बराक ओबामाचा विजय संयुक्त राष्ट्र, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांमध्ये बराक ओबामाचा विजय प्रासंगिक लेखांत निवडणूक पूर्व अंदाज, बराक ओबामाचे अध्यक्षीय मतदानासाठी जाणे, अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये निवडणुकीतील मिळालेल्या आघाडींचा आनंद घेत शेवटी त्याचा विजय होणे, याविषयी माहिती असली पाहिजे. 133 अबू घारिब जेलमधील छळ (हालहाल) अबू घारिब जेलमधील कैद्यांचा अमानवी छळामध्ये सहभाग असलेल्या अमेरिकी लष्करी अधिकार्‍यांविरुद्ध अमेरिका सरकारने कोणती कारवाई केली आहे? प्रासंगिक लेखांत अबू घारिब जेलमधील कैद्यांवर केला जाणार्‍या अमानवी छळामध्ये सहभाग असलेल्या लोकांविरुद्ध केलेली प्रशासनिक (कायदेशीर) कारवाई याविषयी माहिती असली पाहिजे. 134 सिसीवर बंदी घालण्यात आली सिसी संघटनेवर मुस्लिम विद्यार्थ्यांची बंदी प्रासंगिक लेखांत सेमी संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्रसरकारचा निर्णय याविषयी माहिती असली पाहिजे. 135 भारताचे कृषिअभिमुख केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) पी. चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पमधील कृषी क्षेत्रातील विशेष फायदे प्रासंगिक लेखांत केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामधील कृषी विकासासाठी निधीवाटप याविषयी माहिती असली पाहिजे. शेती कर्जात (कृषी कर्जात) सूट देण्याची माहितीदेखील ह्यांत महत्त्वाची आहे. 136 मनोरंजनाच्या जगातील चाचेगिरी चाचेगिरीमुळे आणि ज्या पद्धतींने त्यावर नियंत्रण करतात त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान प्रासंगिक लेखांत चाचेगिरीमुळे आणि चाचेगिरीवर पाबंद घालण्यासाठी सरकार आणि खाजगी संस्थेद्वारे योजलेल्या उपाययोजनांमुळे होणारे थोडे आर्थिक नुकसान याविषयी माहिती असली पाहिजे. 137 एलटीटीईच्या प्रमुखाचा मृत्यू एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लाई याचा मृ्त्यू प्रासंगिक लेखांत श्रीलंकेच्या सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लाई प्रभाकरन याच्या मृ्त्यूविषयी माहिती असली पाहिजे. 138 भारतीय महिला आरक्षण विधेयक भारतीय लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पास होणे प्रासंगिक लेखांत लोकसभा आणि राज्यसभा ह्यांमध्ये तीव्र विरोध असतानादेखील महिला आरक्षण विधेयक पास कसा झाला या संबंधी माहिती असली पाहिजे. 139 सोमाली समुद्री चाच्यांचा पूर्णपणे पराभव करणे सोमाली समुद्री चाच्यांचा पराभव करण्यासाठी विविध देशांद्वारे सुरू करण्यात आलेल्या कारवाया कुप्रसिद्ध सोमाली समुद्री चाच्यांचे मध्येच रस्त्यात अडवणे, अपहरण करणे आणि जहाजे पळविणे तसेच विविध देशांचे असलेले इतर जहाजे, आणि जहाजातील कर्मचारीवर्गाला खंडणीसाठी पकडून ठेवणे (ओलीस ठेवणे) यांचा समावेश प्रासंगिक लेखांत असावा. प्रासंगिक लेखांत समुद्री चाच्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी विविध देशांद्वारे केलेल्या कारवाया आणि ओलीस ठेवलेल्या व्यक्तिंना मुक्त करण्यासाठी होणार्‍या मदत कार्याचे वर्णन याविषयी माहिती असली पाहिजे. 140 अंतराळात पाणी व जीवसृष्टी यावरील संशोधन अंतराळातील पाणी व जीवसृष्टीच्या अस्तित्वबद्दल संशोधन प्रासंगिक लेखांत जीवसृष्टीचे अस्तित्व किंवा पाणी असण्याचे चिन्हे यांवरील संशोधनाबाबत माहिती असली पाहिजे. ह्या मुद्द्यावर वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांच्यामुळे निर्माण झालेले वादविवाद आणि मतभेददेखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. 141 क्लोन केलेल्या मानवी मूलांचा जन्म क्लोनिंग पद्धतीने जन्माला घातलेल्या मानवी मुलांच्या जन्माविषयी बातम्या किंवा दावे प्रासंगिक लेखांत मानवी क्लोनिंग पद्धतीने जन्माला घातलेल्या मानवी मुलांच्या जन्माविषयी बातम्यांचा समावेश असावा. विकृती अथवा रोगाच्या उपचारातील क्लोनिंग पद्धतीच्या वापराविषयी माहिती येथे अप्रासंगिक आहे. 142 बेकायदेशीर झाडे तोडणे महानगरांत बेकायदेशीर झाडे तोडणे आणि प्रशासनाद्वारे उचलेली पावले प्रासंगिक लेखांत महानगरांत बेकायदेशीर झाडे तोडणे, तेथील रहिवाशी आणि स्थानिक लोकांची प्रतिक्रिया, आणि ही क्रिया थांबविण्यासाठी प्रशासनाद्वारे उचलेली पावले याविषयीचा अहवाल असला पाहिजे. 143 टाटाची कार, नॅनो जगातील सर्वात स्वस्त कार, टाटा नॅनो, उद्घाटन केले प्रासंगिक माहिती ही अनेक वाहन प्रदरशनात नॅनो कारचे उद्घाटन आणि आंतरराष्ट्रीय कार मार्केटमध्ये नॅनोबद्दल निर्माण झालेले कुतूहल याविषयी असावी. नॅनो निर्मितीच्या कारखान्यात जमीन वापरण्याविषयी असलेला वादविवाद हा अप्रासंगिक आहे. 144 भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील वायुगळती खटल्याच्या निकालासंबंधी असलेला वादविवाद प्रासंगिक लेखांत भोपाळ वायू दुर्घटनेसंबंधी कायदेशीर संघर्षाचा (लढाईचा) खूपच उशीरा निकाल लागल्यानंतर निर्माण झालेल्या वादाविषयी माहिती असली पाहिजे. खटल्यासंबंधी लोकांची प्रतिक्रिया हीदेखील माहिती मोलाची आहे. 145 बेनजीर भुट्टो यांची हत्या बेनजीर भुट्टो यांच्या हत्येची चौकशी प्रासंगिक लेखांत बेनजीर भुट्टो यांच्या हत्येची चौकशी आणि चौकशीच्या कार्यपद्धतीबद्दल (चौकशीच्या प्रणालीबद्दल) विविध लोक, गट आणि संघटना ह्यांचे विचार व मते यांविषयी माहिती असावी. 146 रामजन्मभूमी निर्णय अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा न्यायालयाचा निकाल प्रासंगिक लेखांत अयोध्या रामजन्मभूमी खटल्यातील वेगवेगळ्या न्यायालयांनी दिलेले निकाल याविषयी माहिती असली पाहिजे. 147 भारतातील सायबर गुन्हा भारतातील अनिर्बंधपणे वाढणारा (बेसुमार) सायबर गुन्हा (संगणकीय गुन्हा) प्रासंगिक लेखांत भारतात घडलेल्या सायबर गुन्ह्याविषयी (संगणकीय गुन्ह्याविषयी) माहिती असली पाहिजे. सायबर-गुन्हा थांबविण्यासाठी उचलेली पावले याविषयी माहिती ही साहजिकच महत्त्वाची नाही (माहिती ही साहजिकच अप्रासंगिक आहे). 148 सामाजिक नेटवर्किंग स्थळांची लोकप्रियता सामाजिक नेटवर्किंग स्थळांची जागतिक लोकप्रियता सर्वत्र असेलली सामाजिक नेटवर्किंग स्थळांची जागतिक लोकप्रियता आणि अशा प्रकारचा मोठा चाहता वर्ग एकत्र आणण्यामागची कारणे याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत पाहिजे. 149 दिल्लीमधील राष्ट्रकुल खेळ (कॉमनवेल्थ खेळ) दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे यशस्वी पाऊल राष्ट्रकुल खेळांमधील भारतीय खेळाडुंची यशस्वी कामगिरी याविषयी माहिती ही प्रासंगिक आहे. खेळांसंबंधी प्रकरणे याठिकाणी अप्रासंगिक आहेत. 150 बिल गेट्सचे परोपकारी प्रयत्न लोककल्याण्याचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्त होण्याचा बिल गेट्सचा निर्णय मायक्रोसॉफ्टचा प्रमुख बिल गेट्स यांनी लोककल्याण आणि सामाजिक कार्य आपल्या पुढे चालू ठेवण्यासाठी पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. प्रासंगिक लेखांत त्यांच्या निवृत्तीच्या या निर्णयाचे वर्णन आणि तपशील असेल. 151 एका भारतीयाला रसायनशास्त्रात नोबल पुरस्कार मिळाला भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाला रसायनशास्त्र आणि त्याच्या सर्व संशोधनासाठी नोबल पुरस्कार मिळतो रसायनशास्त्र आणि त्याच्या संशोधनाच्या विषयासाठी नोबल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाची माहिती प्रासंगिक लेखांत आहे. 152 भारतातील यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी भारतातील यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी आणि समकालीन प्रतिक्रिया भारतातील यशस्वी क्षेपणास्त्र चाचण्यांची सविस्तर माहिती, आणि ह्या चाचण्यासंबंधी समकालीन प्रतिक्रिया हे सर्व प्रासंगिक आहेत. 153 सौर प्रणालीची रचना सौर प्रणालीमध्ये नवीन ग्रहाचा शोध आणि सौर प्रणालीच्या संरचनेबद्दल खगोलशास्त्रज्ञांमधील वाद नवीन ग्रहाचा शोध , या शोधावर खगोलशास्त्रज्ञांमधील वाद, आणि प्लुटोला ग्रह मानायचे की नाही ह्याबद्दलची मते याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत असली पाहिजे. 154 ए. राजा आणि २जी स्पेक्ट्रम घोटाळा २जी स्पेक्ट्रम घोटाळा संबंधी ए. राजावर ठेवलेले आरोप आणि त्यासंबंधित चौकशी हुडकून काढलेल्या (शोधून काढलेल्या) लेखांत २जी स्पेक्ट्रम घोटाळा संबंधी ए. राजावर ठेवलेले आरोप, त्यासंबंधी सुरू झालेली चौकशी आणि शेवटी ए. राजा यांचे पदावरून निवृत्त होणे याविषयी माहिती असली पाहिजे. 155 मुंबईत झालेले ताजवरील आक्रमण २००८मध्ये मुंबईत झालेला ताजवरील दहशतवादी आक्रमण फक्त मुंबईत झालेल्या ताजवरील दहशतवादी आक्रमणाचे सविस्तर वर्णन येथे महत्त्वाचे आहे (येथे प्रासंगिक आहे). इतर ठिकाणी झालेली आक्रमणे (उदा. रेल्वे स्थानक, ऑबेराय ट्रिडेन्ट, लिओपोल्ड केफ, नरीमन हाऊस, इत्यादी) ही अप्रासंगिक आहेत (येथे महत्त्वाची नाहीत). 156 आईपीएलच्या वादातील शशी थरूर आईपीएलच्या वादातील शशी थरूर यांचा सहभाग आणि त्याबद्दल त्यांची भूमिका आईपीएलच्या वादातील शशी थरूर यांचा सहभाग, त्यांच्याविरुद्ध दाखवलेली कारणे, आणि ह्यां घटनांमुळे त्यांना संसदेतील मंत्रीपदावरून राजीनामा कसा द्यावा लागतो याविषयी माहिती प्रासंगिक आहे (याविषयी माहिती ह्या लेखांत पाहिजे). 157 यशस्वी भारतीय चित्रपट भारतीय चित्रपटांना चित्रपटसृष्टीतील मिळालेले यश आणि मिळालेले पुरस्कार भारतीय चित्रपटांना भारतात तसेच भारता बाहेर चित्रपटसृष्टीत मिळालेले यश, आणि मिळालेले पुरस्कार व प्रशंसा. 158 अफगाणिस्तानवर अमेरिकेचे आक्रमण अमेरिकेच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणाचे मुसलमानी देशांच्या प्रतिक्रिया अफगाणिस्तानवर झालेले अमेरिकाचे आक्रमण हे मुसलमानांवर झालेले एक आक्रमण आहे, असे मत काही राजकारणी लोकांनी व्यक्त केले. प्रासंगिक लेखांत जगभरातील मुसलमानांच्या आक्रमणाविषयी प्रतिक्रिया आणि मते ह्यांचा अहवाल असला पाहिजे. 159 २००८च्या निवडणुकांमधील शेख हसिना २००८मध्ये झालेल्या ९व्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये झालेला शेख हसिनाचा विजय बांगला देशात २००८मध्ये झालेल्या ९व्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये झालेला शेख हसिनाचा विजय, आणि इतर देशांकडून तिला मिळालेल्या शुभेच्छा ह्याविषयी माहिती येथे प्रसांगिक आहे (ह्याविषयी माहिती येथे महत्त्वाची आहे). 160 इराक युद्ध २००३ २००३च्या इराक युद्धात यू. एस. ए.च्या भूमिकेवर केलेली कडक टीका २००३मध्ये इराकवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिकेला कडक टीका आणि विरोधाला सामोरे जावे लागले याचे वर्णन ह्या लेखांत प्रासंगिक आहे. 161 जॉर्ज बुशची अतिरेकीविरोधी कारवाई कायद्यांद्वारे जगातील दहशतवादापासून मुक्त करण्यामागची जॉर्ज बुशची भूमिका दहशतवाद खंबीरपणे हाताळण्यासाठीच्या जॉर्ज बुश यांच्या प्रयत्नांत, त्यांनी अनेक देशांना सुचविले आहे की ते दहशतवादी विरोधी कायदे तयार करा, किंवा अस्तित्वात असलेले कायदे अधिक कडक (तीव्र) करा. प्रासंगिक लेखांत अशा प्रकारच्या राजनैतिक प्रयत्नांविषयी माहिती असली पाहिजे. 162 महाप्रचंड मोठ्या वावटळी जगातील विविध भागांमध्ये वावटळीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान गेल्या काही वर्षांत, ऐला, काट्रिना आणि लैला यासारखी मोठी वादळे (झंझावत) आणि वावटळींमुळे खूप मोठे नुकसान (खूप मोठी नासाडी) व जीवित हानी झालेली आहे. प्रासंगिक लेखांत जीवित हानी, संकटात सापडलेल्या लोकांचे पुनवर्सन आणि त्यांना पाठवेली मदत ह्याविषयी सविस्तर माहिती असावी. फक्त जेथे काही लोकांवरच परिणाम झाला आहे अशा वेगवेगळ्या घटनांचे वर्णन येथ महत्त्वाचे नाही (येथे प्रासंगिक नाही). 163 भारतातील व्याघ्र संवर्धन भारतीय व्याघ्र संवर्धन कायदे आणि व्याघ्र संवर्धन प्रकल्प भारतातील व्याघ्र संवर्धन कायदे हे प्रासंगिक आहेत आणि त्याचबरोबर व्याघ्र संवर्धन संबंधी सरकारचे प्रयत्न, तसेच प्राणिसंग्रहालय आणि सुरक्षित जंगलांमधील वाघ नष्ट होण्याची कारणे ही माहितीदेखील प्रासंगिक लेखांत असली पाहिजे. मानवाद्वारे होणार्‍या वाघांच्या हत्येविषयी बातम्या ह्या साहजिकच येथे अप्रासंगिक आहे. 164 मायकल जॅक्सन आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण मायकल जॅक्सनवर लावलेले मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आणि पुढील होणारी चौकशी प्रासंगिक लेखांत मायकल जॅक्सनवर लावलेले मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप, ह्यां आरोपांबाबत सुरू केली गेलेली चौकशी आणि त्याने केलेले आरोपांचे खंडण ह्यांविषयी माहिती असली पाहिजे. 165 विवाह किंवा घटस्फोट कायदे नवीन विवाह आणि घटस्फोट कायदे तसेच जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा (दुरुस्ती) प्रासंगिक माहितीमध्ये नवीन विवाह आणि घटस्फोट कायदे, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये दुरुस्ती, आणि या बदलांच्या विरोधात उठवलेला आवाज यांचा समावेश असावा. स्त्रियांच्या विकासावर या कायद्यांचा स्त्रियांच्या विकासावर होणारा परिणाम हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. 166 कनिष्क विमान दुर्घटना १९८५मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात बॉम्बस्फोट प्रासंगिक लेखांत १९८५मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात झालेल्या बॉम्बस्फोटाचे वर्णन आणि मृत्यूंची संख्या यांचा समावेश असला पाहिजे. 167 चेचन लोकांचे बंड आणि सरकार चेचन बंडखोरांच्या मागण्या आणि सरकार विरोधी त्यांच्या हालचाली. रशिअन सराकर आणि लष्कर यांच्याद्वारे केलेल्या कडक (तडकाफडकी) कारवाया चेचन बंडखोरांनी केलेल्या मागण्या, त्यांच्याद्वारे सरकार विरोधी केलेल्या हालचाली, अशा रक्तपाती हल्ल्यात जखमी किंवा मृतांची संख्या, हे थांबविण्यासाठी रशिअन सराकर आणि लष्कर यांच्याद्वारे केलेल्या कडक (तडकाफडकी) कारवाया ही सर्व माहिती प्रासंगिक लेखांत असली पाहिजे. 168 सू की यांना नजरकैदेची शिक्षा धार्जिणी लोकशाहीचा नेता सू की यांना नजरकैदेच्या शिक्षे विरोधात केली गेलेली जगभरातील सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया प्रासंगिक लेखांत धार्जिणी लोकशाहीचा नेता सू की यांच्या नजरकैदेच्या शिक्षेची बातमी कळताच जगातील विविध भागांतून येणार्‍या प्रतिक्रिया याचे वर्णन असले पाहिजे. कैदेतून तिची सुटका ह्याविषयी माहिती येथे प्रासंगिक नाही (येथे महत्त्वाची नाही). 169 नक्षलवाद्यांचे आक्रमण छत्तिसगड आणि झारखंड यांमधील नक्षलवाद्यांचे आक्रमण व त्यांचे आक्रमण थांबविण्यासाठी केलेल्या कारवाया प्रासंगिक लेखांत झारखंड आणि छत्तिसगड यांमधील राज्यांत झालेल्या नक्षलवाद्यांच्या आक्रमणाची वर्णने असली पाहिजेत. पोलीस आणि राज्य शासन हे ज्या पद्धतीने ही गोष्ट हाताळत आहे, अशी माहितीदेखील प्रासंगिक आहे. नक्षलवाद्यांच्या आपापसातील चकमकी आणि त्यांच्या गटांमध्ये असलेले राजकारण येथे महत्त्वाचे नाही. 170 भारतीय हॉकीचा विकास आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय हॉकी आणि भाताचे विजय या गोष्टींना पुन्हा चालना देण्याचे प्रयत्न प्रासंगिक लेख हा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय हॉकीमध्ये सुधारणा आणण्याचे आणि पुन्हा चालना देण्याचे प्रयत्न, पुरुष व महिला हॉकी संघांद्वारे मिळवेलेल विजय याविषयी असावा. त्यात भारतीय हॉकीच्या लोकप्रियतेची थोडी माहितीदेखील असली पाहिजे. 171 बेस्ट बॅकरी खटल्यातील मुख्य साक्षीदार बेस्ट बॅकरी खटल्यातील मुख्य साक्षीदार, जहीरा शेख हिचे आधीची विधाने खोटी असल्याचे सांगून साक्ष फिरवणे आणि तिला मिळालेली शिक्षा प्रांसगिक लेखांत आधीची विधाने खोटी असल्याचे सांगून जहीरा शेख (बेस्ट बॅकरी खटल्यातील मुख्य साक्षीदार) हिचे साक्ष फिरवणे, आणि त्यामुळे न्यायालयाद्वारे दिली गेलेली तिला शिक्षा ही माहिती असली पाहिजे. 172 भारतामधील स्त्री भ्रूणहत्या भारतामधील स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी केलेल्या कायदेशीर व सामाजिक कारवाया प्रासंगिक लेखांत भारतामधील स्त्री भ्रूणहत्या, स्त्री गर्भ हत्या करण्यामागची कारणे आणि ही प्रथा थांबविण्यासाठीच्या पद्धती याविषयी माहिती असली पाहिजे. लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी कायदेशीर व सामाजिक कृती याविषयी माहितीदेखील प्रासंगिक आहे. 173 २००८ ऑलिंपिक २००८ ऑलिंपिक मशाल रिले संबंधी असलेले मतभेद बीजिंगमध्ये २००८ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सुरू होण्या आधी मशाल रिले संबंधी असलेले विरोध आणि मतभेद याविषयी माहिती प्रासंगिक आहे. 174 आंतरराष्ट्रीय आर्थिक घट (घसरण) भारतीय अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटाचा परिणाम २००८च्या काळात आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केट घसरले. प्रासंगिक माहितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार्‍या आर्थिक संकटाच्या परिणामाचे वर्णन असले पाहिजे. 175 कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा धावांचा विक्रम कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा धावांचा विक्रम कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने तोडलेले स्वतःचे तसेच इतरांचे विक्रम याविषयी माहिती प्रासंगिक लेखांत पाहिजे. अलीकडीन केलेले नवीन विक्रमदेखील येथे प्रासंगिक आहे. या संदर्भात एकदिवसी क्रिकेट आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रासंगिक नाहीत.