76
गुर्जर आणि मीना ह्यांमधील विवाद
भटक्या जमातीमध्ये गुर्जरांच्या समावेशनाविरोधी मीना नेत्यांनी केलेल्या निषेधामागील कारणे
भटक्या जमातीत प्रवेश मिळवण्यासंदर्भात गुर्जरांचे आंदोलन चालू आहे. मीना गटातील नेते ह्या चालीला तीव्रपणे विरोध करत आहेत. मीनांच्या विरोधामागचे प्रमुख कारण काय आहे? संबंधित कागदपत्रात ह्या दोन गटांमधील तंट्याच्या मूळ कारणाचा(कारणे) उल्लेख असायला हवा.
77
हिझ्बुल्ला गुरील्लांची आक्रमणे
हिझ्बुल्ला गुरील्लांची भारतीय आणि इस्राइली सैन्यावरील आक्रमणे
संबंधित कागदपत्रातून हिझ्बुल्ला गुरील्ला ह्यांच्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्राइलमध्ये तैनात असलेल्या भारतीय आणि इस्राइली सैन्यावरील आक्रमणांविषयी माहिती पुरविण्यात यायला हवी.
78
राममंदिराच्या मु्द्यावरून अडवाणी आणि सिंघल ह्यांच्यातील वाद
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल आणि भाजप नेते एल. के. अडवाणी ह्यांच्यातील राममंदिराच्या मु्द्यावरील वाद
संबंधित कागदपत्रातून विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल आणि भाजप नेते एल. के. अडवाणी ह्याच्यात चालू असलेल्या राममंदिराच्या मु्द्यावरील वादविवादाविषयीची माहिती पुरविण्यात यायला हवी. इतर मुद्यांवरील ह्या दोन नेत्यांच्या वादाविषयी माहिती किंवा इतर विहिंप आणि भाजप नेते ह्यांविषयीची माहिती असंबंधित आहे.
79
चीन आणि माऊंट एव्हरेस्ट दरम्यान रस्ता बांधणे
चीनपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत रस्ता बांधण्याची योजना
संबंधित कागदपत्रात चीनपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत रस्ता बांधण्याच्या योजनेचे चित्रण करायला हवे. भारतीय आणि चीनी अधिकार्यांच्या ह्या मुद्याबाबच्या चर्चादेखील संबंधित आहेत.
80
अडवाणींच्या विरोधात बाबरी मशीद पाडण्याबाबतची केस दाखल झाली.
बाबरी मशीद पाडण्याबाबत अडवाणींच्या सहभागामुळे त्यांच्या विरोधातील कायदेशीर कारवाईला प्रारंभ झाला.
संबंधित कागदपत्रात एफआयआरची नोंदणी, किंवा रायबरली न्यायालयाने मंजूर केलेले आदेश ह्यांसह अडवाणींच्या विरोधातील सुरवातीच्या कायदेशीर पावलांबाबतची माहिती समाविष्ट असायला हवी. ही केस अलाहबाद उच्च न्यायालयात पाठवण्याबाबत उचललेली पावले किंवा अलाहबाद उच्च न्यायालयात काय घडले ह्या विषयीची माहिती संबंधित नाही.
81
जपानी मस्तिष्कशोथाच्या (एन्सेफलायटीसच्या) विरोधात भारतातील लशीकरण कार्यक्रमाशी संबंधित प्रश्न
भारतातील आरोग्य मंत्रालयाने भारतातील मुलांना जपानी एन्सेफलायटीसच्या उद्रेकात संरक्षण मिळावे म्हणून काही योजना तयार केल्या आहेत. ह्या योजना कार्यान्वित करण्याच्या सत्रात कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात.
भारतीय मुलांचे जपानी मस्तिष्कशोथाच्यासंदर्भात (एन्सेफलायटीस) लशीकरण करताना कोणते प्रश्न निर्माण होतात? त्या पैकी एक प्रश्न म्हणजे भारतात पुरेशा लशींची निर्मिती होत नाही. त्यामुळे परदेशातून (विशेषतः चीन) लस आयात करण्याच्या शक्यतेचा विचार केला जात आहे. ह्या संदर्भातील चर्चादेखील संबंधित समजली जाईल.
82
श्रीनगर आणि मुजफ्फराबाद दरम्यान प्रस्तावित बससेवा
श्रीनगर आणि मुजफ्फराबाद दरम्यान प्रस्तावित बससेवा आणि भारत-पाक विवाद सोडविण्यात तिची भूमिका
भारतातील श्रीनगर आणि पाकिस्तानातील मुजफ्फराबाद ह्यांदरम्यान प्रस्तावित बससेवेचा विचार केला जात आहे. दोन देशातील विवाद सोडविण्यात ह्यामुळे कोणत्या आशा वाढल्या आहेत? सेवा विस्कळीत करण्यासाठी अतिरेकी संघटनेने बसवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अशा धमक्यांविषयीची माहितीदेखील संबंधित आहे.
83
लालू प्रसाद यादव आणि राम विलास पासवान ह्यांची निवडणूक मोहीम
मुसलमान मतदारांची मते मिळविण्यासाठी लालू प्रसाद यादव आणि राम विलास पासवान ह्यांनी केलेले प्रयत्न
संबंधित कागदपत्रात मुसलमान मतदारांची मते मिळविण्यासाठी लालू प्रसाद यादव आणि राम विलास पासवान ह्यांनी केलेल्या प्रयत्नाविषयीचे वर्णन असेल. मुसलमानांना देऊ केलेली विविध आश्वासने आणि आकर्षणे ह्यांबाबत विशेष रस आहे.
84
स्वामी रामदेव ह्यांच्या विरोधी वृंदा करात हयांचे आरोप
स्वामी रामदेव ह्यांच्यातर्फे विकल्या जाणार्या औषधांमध्ये प्राण्यांच्या अवयवांचा समावेश असतो असा आरोप वृंदा करात ह्यांनी केला आहे.
संबंधित कागदपत्रात वृंदा करात ह्यांनी रामदेवबाबा विकत असलेल्या औषधांमध्ये प्राण्यांच्या अवयवांचा समावेश असतो त्यामुळे हे भारतीय औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्याचा परवाना मोडला जातो आणि माहितीचे नियम धाब्यावर बसविले जातात ह्याविषयी केलेल्या तक्रारीची माहिती असायला हवी.
85
पोलीस कोठडीत असलेला अबू सालेम हा मुंबई बॉमस्फोटात आरोपी
पोलीस कोठडीत असलेल्या मुंबई बॉमस्फोटातील आरोपी अबू सालेम ह्याला न्यायालयाने रिमांड देण्याचा आदेश मंजूर केला आहे
मुंबई बॉमस्फोटात अबू सालेमच्या सहभागाविषयीची माहिती संबंधित आहे. प्रदीप जैन हत्या खटला, बनावटी पारपत्र खटला ह्यांसारख्या त्याच्या विरोधी असलेल्या इतर आरोपाविषयीची माहिती असंबद्ध आहे.
86
मुंबई आणि दिल्ली विमानतळाचे खाजगीकरण
शासनाने मुंबई आणि दिल्ली विमानतळाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भात बोलीच्या निविदादेखील मागविल्या आहेत.
संबंधित कागदपत्रात मुंबई आणि दिल्ली विमानतळाचे आधुनिकीकरण आणि खाजगीकरण करण्याच्या निर्णयाबाबतच्या माहितीचा समावेश असायला हवा. अनिल अंबानी ह्यांच्या मालकीच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर लि. चा दोन्ही विमानतळांच्या बोलीच्या प्रक्रियेतील सहभाग हेदेखील संबंधित आहे. परंतु त्या नंतरचे लेख असंबद्ध आहेत.
87
सियाचिन सभोवतीच्या सैन्याच्या स्थानाविषयी मनमोहन सिंह आणि परवेझ मुशर्रफ ह्यांच्यामधील चर्चा
सियाचिन सभोवतीच्या सैन्याच्या स्थानाविषयी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पाकीस्तानचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ ह्यांच्यामधील चर्चा
संबंधित कागदपत्रात सियाचीन सभोवतीच्या सैन्याच्या स्थानाविषयी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पाकीस्तानचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ ह्यांच्यामधील संभाषण/चर्चा ह्याविषयी माहिती समाविष्ट असायला हवी.
88
शंकर रामन खून खटल्यातील आरोपीच्या अटकेविरोधातील प्रसिद्ध निषेध
जयेंद्र सरस्वती, कांचीचे शंकराचार्य आणि विजयेंद्र सरस्वती ह्यांच्यावरील शंकर रामन खूनातील सहभागाविषयीचा आरोप आणि ह्या अटकेविरोधात लोकांचा निषेध
कनिष्ठ शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती ह्यांच्यासोबत जयेंद्र सरस्वती, कांचीचे शंकराचार्य ह्यांना शंकर रामन खूनातील सहभागाविषयीच्या आरोपावरून अटक झाली. संबंधित कागदपत्रात अटक आणि अटकेविरोधातील प्रसिद्ध निषेध ह्याविषयीची माहिती असायला हवी.
89
काँग्रेस मंत्र्यांचा 'तेलासाठी अन्न' घोटाळ्यातील सहभाग
परराष्ट्रीय मंत्री नटवर सिंह आणि इतर काँग्रेस नेते ह्यांचा इराकी 'तेलासाठी अन्न' घोटाळ्यातील सहभाग आणि संबंधित तपास
संबंधित कागदपत्रात इतर काही काँग्रेस नेत्यांसोबत, परराष्ट्रीय मंत्री नटवर सिंह ह्यांचा इराकी 'तेलासाठी अन्न' प्रकरणातील सहभाग आणि सक्तवसुली संचलनालयाने त्या संबंधी केलेला तपास
90
भारतीय प्रतिनिधींची बांग्लादेशाला भेट
भारतीय प्रतिनिधींच्या गटाची, पाणीवाटप, सुरक्षा आणि सैनिकांसाठी प्रशिक्षण छावणी ह्या मुद्यांबाबत चर्चा करण्यासाठी ढाका येथे भेट
संबंधित कागदपत्रात भारतीय प्रतिनिधींनी बांग्लादेशाला दिलेल्या भेटीसंदर्भातील खालील मुद्यांपैकी एक किंवा अधिक मुद्यांची माहिती असायला हवी.
-भारत आणि बांग्लादेशात टीस्ता पाणीवाटप
-सैनिकांसाठी सुरक्षा आणि प्रशिक्षण छावणी
- बांग्लादेशाने त्यांच्या भूमीवर अतिरेकी छावण्यांच्या अस्तित्वाला दिलेल्या नकारामुळे भारताची निराशा झाली आहे.
- युएलएफए सैनिकांना बांग्लादेशात प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यांचे उपक्रम तेथूनच नियंत्रित केले जातात असा भारताचा समज आहे.
91
प्रतिभा पाटील ह्यांच्यावर वित्तीय भ्रष्टाचाराचा आरोप
प्रतिभा पाटील ह्यांच्यावर वित्तीय भ्रष्टाचाराचा गुन्हा
संबंधित कागदपत्रात प्रतिभा पाटील ह्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या, नातेवाईकांना सहकारी बँकेतून विनापरतीचे कर्ज घेण्यासाठी असलेल्या कारगील निधीसारख्या भ्रष्टाचाराच्या विविध गुन्ह्यांविषयीची माहिती असायला हवी. ह्या आधारावर प्रतिभा पाटील ह्यांच्या राष्ट्रपती पदाच्या नामांकनाला एनडीएने केलेल्या निषेधाबद्दलची माहितीदेखील संबंधित आहे.
92
श्रीलंकेच्या तामिळी वाघांचे उपक्रम
श्रीलंकेच्या तामिळी वाघांचे विद्रोही उपक्रम
संबंधित कागदपत्रात नागरी युद्धामधील श्रीलंकेच्या तामिळी वाघांची भूमिका, श्रीलंकेच्या सैनिकांवरील हल्ला इत्यादींसारख्या त्यांच्या विविध विध्वंसक उपक्रमविषयीची माहिती असायला हवी.
93
संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच घेणे
भारतीय संसदेतील सदस्यांना संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच स्वीकारताना कॅमेरात पकडले.
लोकसभेतील आणि राज्यसभेतील काही सदस्य संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच स्वीकारताना कॅमेर्यात पकडले गेले ह्या प्रकरणाला उघडकीस आणण्याविषयीची माहिती संबंधित कागदपत्रात असायला हवी.
94
भारतीय नौदलावर गुप्त माहिती फोडण्याचा आरोप
गुप्त माहिती भारतीय नौदलाकडून फोडली गेली ह्या आरोपांबाबतची तपासणी
भारतीय नौदलावर परकीय सत्तांकडे गुप्त माहिती फोडण्याचा आरोप आहे. संबंधित कागदपत्रात ह्या आरोपासंदर्भात सीबीआयच्या तपासाची माहिती असायला हवी.
95
बिग ब्रदरच्या कार्यक्रमात वर्णभेदाचा कोलाहल
बिग ब्रदरच्या कार्यक्रमातील वर्णभेदाच्या कोलाहलात शिल्पा शेट्टी आणि जेड गुडी ह्यांचा समावेश
संबंधित कागदपत्रात बिग ब्रदर ह्या मान्यवरांच्या कार्यक्रमात जेड गुडीची शिल्पा शेट्टीबाबतची वर्तणूक आणि ह्या वर्तणुकीबाबत शिल्पाची प्रतिक्रिया ह्याबद्दलची माहिती असायला हवी.
96
प्रमोद महाजन ह्यांचा खूनी
प्रमोद महाजन ह्यांच्या खुन्याने न्यायालयात दिलेल्या जबानीत त्याच्यावरील गुन्हा नाकबूल केला आहे.
प्रमोद महाजन खून खटल्यातील आरोपीने त्याच्यावरील गुन्हा नाकबूल केला आहे. संबंधित कगदपत्रात त्याच्या नकाराविषयीची माहिती असायला हवी.
97
रिलायन्स ग्रुपच्या स्वामित्वावरून अंबानी भावांमध्ये वाद
मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ह्यांच्यात रिलायन्स ग्रुपच्या स्वामित्वावरून वाद
मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ह्यांच्यात रिलायन्स ग्रुपच्या स्वामित्वावरून वाद आणि के. व्ही. कामत ह्यांनी रिलायन्स ग्रुपच्या संपत्तीच्या मूल्यनिर्धारणावर सादर केलेल्या अंतिम अहवालाविषयीची माहिती संबंधित आहे.
98
अरुणाचलप्रदेशावर चीनने केलेला दावा भारताने फेटाळला
अरुणाचलप्रदेशावर चीनने केलेल्या दाव्याची भारताने केलेली फेटाळणी
संबंधित कागदपत्रात अरुणाचलप्रदेशावर चीनने केलेल्या दाव्याची भारताने केलेली फेटाळणी आणि आपल्या मताला आधार देण्यासाठी भारताने सादर केलेला युक्तीवाद ह्याविषयीची माहिती असायला हवी. अरुणाचलप्रदेश शासनाने तयार केलेले निवेदन असंबद्ध आहे.
99
लालू प्रसाद यादव आणि चारा घोटाळा
लालू प्रसाद यादव ह्यांच्या चारा घोटाळ्यात असलेल्या सहभागाशी संबंधित पुरावा
संबंधित कागदपत्रात रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांच्या लक्षावधींच्या चारा घोटाळ्यात असलेल्या सहभागाशी संबंधित पुराव्याविषयीची माहिती असायला हवी.
100
मोनिका बेदी आणि बनावटी पारपत्र खटला
मोनिका बेदी हीच्यावर हैद्राबाद येथे बनावटी पारपत्र मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित कागदपत्रात मोनिका बेदी हीच्यावर हैद्राबाद येथे खोट्या नावाने बनावटी पारपत्र मिळवल्याबद्दल दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि ह्या संदर्भात सीबीआयने केलेला तपास ह्याबाबतची माहिती संबंधित आहे. बनावटी पारपत्र मिळवल्याची इतरत्र असलेली माहिती असंबंधित आहे.
101
प्रमोद महाजन ह्यांच्या बंगल्यावर अंमली पदार्थांची पार्टी
कै. प्रमोद महाजन ह्यांच्या शासकीय बंगल्यात राहुल (त्यांचा मुलगा), विवेक मेहेत्रा आणि संभाव्यपणे इतरांचा समावेश असलेल्या मद्यपान आणि अंमली पदार्थांची पार्टीबद्दलची सविस्त माहिती
राहुल महाजन आणि विवेक मेहेत्रा ह्यांचा राहुलचे वडील, कै. प्रमोद महाजन ह्यांच्या शासकीय निवासात रात्री खूप उशीरापर्यंत चाललेल्या मद्यपान आणि अंमली पदार्थांच्या पार्टीत समावेश होता. संबंधित कागदपत्रात त्या रात्री काय घडले, उदा. कोण उपस्थित होते, कोणते मादक पदार्थ/अंमली पदार्थ घेतले गेले इत्यादीबाबतची सविस्तर माहिती असायला हवी. ह्या घटनेच्या परिणामांवर लक्षकेंद्रित केलली कागदपत्रे , त्याची राजकीय गुंतवणूक, राहुलच्या वैद्यकीय अहवालात समाविष्ट असलेले वाद-प्रतिवाद, पोलीसी तपास इत्यादी माहिती संबंधित नाही.
102
पाकीस्तानी क्रिकेटपटू अंमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकरणात सहभागी
शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ ह्यांच्या विरोधात अंमली पदार्थांच्या सेवनाचा गुन्हा दाखल
संबंधित कागदपत्रात शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ ह्यांच्या विरोधात दाखल केलेल्या अंमली पदार्थ सेवनाच्या गुन्ह्याविषयीची किंवा ह्या खटल्यात सीएएस ह्यांनी उचललेल्या पावलाविषयीची विशिष्ट माहिती असायला हवी.
103
बागलिहारच्या जलविद्युत प्रकल्पाच्या सभोवारचे द्विपक्षीय प्रश्न
बागलिहारच्या जलविद्युत प्रकल्पातील भारत-पाक वादात भारताचे स्थान काय आहे?
बागलिहारच्या जलविद्युत प्रकल्पाने भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधु आणि तिच्या उपनद्या ह्याच्या पाणी वाटपाच्या मु्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. संबंधित कागदपत्रात ह्या मुद्याबाबत भारताची भूमिका समाविष्ट केली पाहिजे.
104
जया बच्चन ह्यांची राज्यसभेच्या सदस्यत्वातून हकालपट्टी
लाभाच्या पदाच्या मुद्यावरून राज्यसभेच्या सदस्यत्वातून अपात्र ठरविले गेल्यानंतर जया बच्चन ह्यांनी कोणती कायदेशीर पावले उचलली आहेत?
लाभाच्या पदाच्या मुद्यावरून जया बच्चन ह्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वातून अपात्र ठरविले गेले. संबंधित कागदपत्रात जया बच्चन ह्यांनी ह्या निर्णयाच्या विरोधात घेतलेला कायदेशीर आधार समाविष्ट केला जावा.
105
ताज हेरीटेज कॉरीडॉर घोटाळा
करोडोंच्या ताज हेरीटेज कॉरीडॉर घोटाळ्यात उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी ह्यांच्यावर असलेल्या सहभागाच्या आरोपाचा सीबीआय तपास
संबंधित कागदपत्र हे सीबीआयने १७५ कोटींच्या ताज हेरीटेज कॉरीडॉर घोटाळ्यासंदर्भात मायावती, डी. एस.बग्गा आणि आर. के. शर्मा ह्यांच्या केलेल्या तपासाच्या माहितीवर केंद्रित असायला हवे.
106
तस्लिमा नसरीन ह्यांच्या लज्जा ह्या कादंबरीवर बंदी
तस्लिमा नसरीन ह्यांच्या लज्जा ह्या कादंबरीने मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली
संबंधित कागदपत्रात तस्लिमा नसरीन ह्यांच्या लज्जा ह्या कादंबरीविरोधातील मुस्लिम समाजाचा संताप किंवा कादंबरीवरील बंदीचा परिणाम. इतर कोणत्याही कादंबरीविषयीची माहिती संबंधित नाही.
107
उत्तर प्रदेशात मुसलमानांविरोधी भावना असलेली सीडी प्रकाशित करण्यास उत्तेजना
भाजपवर भारताच्या उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या काळात मुसलमानांविरोधी साहित्य असलेली सीडी प्रकाशित करण्याचा आरोप आणि भाजपने ह्या संदर्भात उचललेली पाऊले.
संबंधित कागदपत्रात उत्तरप्रदेशात मुसलमानांविरोधी सीडी प्रकाशित करण्यात भाजपचा सहभाग किंवा सीडी तयार करणे/त्यात सुधार करणे ह्यांत सहभागी असलेल्या भाजप पक्ष सदस्यांचे निलंबन ह्या विषयीची माहिती असायला हवी.
108
ग्रेटर नागालँड
नागा संघटना एनएससीएनची ग्रेटर नागालँडसाठी मागणी आणि ह्या मागणीविरोधी शेजारच्या राज्यांनी केलेला निषेध
संबंधित कागदपत्रात ग्रेटर नागालँडसाठी मागणी आणि ह्या चळवळीला आसाम, मणिपूर, व अरुणाचलप्रदेश ह्यांचा विरोध ह्याविषयीची माहिती असायला हवी.
109
राज ठाकरेंद्वारा नवा राजकीय पक्ष स्थापन
राज ठाकरे ह्यांचा मुंबईत नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय आणि नव्या पक्षाबाबत त्यांची घोषणा
संबंधित कागदपत्रात राज ठाकरे आणि त्यांचा चुलत भाऊ उद्धव ठाकरे (बाळ ठाकरेंचा मुलगा) ह्यांच्यामधील सततचे वाद आणि राज ठाकरे ह्यांचा मुंबईत नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय ह्याविषयीची माहिती असायला हवी.
110
भारत-चीन संबंध आणि सीमेवरील व्यापार
नथुल्ला मार्गाने सीमेवरील व्यापार आणि भारत-चीन संबंधांवर त्याचा होणारा परिणाम
सीमेवरील व्यापाराद्वारे भारत-चीन संबंध सुधारण्याची आशा, अपेक्षा आणि ह्या संदर्भात दोन्ही देशातील सरकारी अधिकार्यांची समज, विवादास्पद मुद्याची क्षमता इत्यादी माहिती संबंधित आहे. नथुल्लामार्गे सामानाच्या दळणवळणाबाबतची सविस्तर माहिती संबंधित आहे.
111
मुंबईत डान्सबारवर बंदी
मुंबईच्या डान्सबारवर बंदी आणि बारबालांनी ह्या बंदीविरोधी केलेला निषेध
संबंधित कागदपत्रात मुंबईत डान्सबारवर बंदी आणण्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत किंवा बारबालांनी डान्सबार बंद करण्यासाठी दिलेल्या आदेशाविरोधी आयोजित निषेध/मोर्चा ह्याविषयीच्या माहितीचा ह्यांत समावेश असायला हवा.
112
गुन्हेगारी विश्व आणि गुटखा उत्पादक ह्यांच्यामधील संबंध
गोवा आणि माणिकचंद गुटखा उत्पादक कंपनी आणि दाऊद इब्राहिम ह्यांच्यातील संबंध
संबंधित कागदपत्रात माणिकचंद गुटख्याचे मालक आणि गोवा गुटखा कंपनी व गँगस्टर दाऊद इब्राहिम ह्यांच्यामधील संबंधांविषयीची माहिती असायला हवी. दाऊद इब्राहिम आणि इतर कंपन्यांमधील संबंधांविषयीची माहिती संबंधित नाही.
113
बांग्लादेशातील राजकीय वादविवाद
बीएनपी अंतर्गत आणि बीएनपी व बांग्लादेशातील अवामी लीग ह्यांच्यामधील वादविवाद
संबंधित कागदपत्रात सध्याचे बीएनपी समर्थक आणि ज्यांनी हा पक्ष सोडला आहे अशांमधील वादविवाद, शेख हसीना आणि खलिदा जिया ह्यांच्या समर्थकांमधील वाद आणि ह्या भांडणात मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या ह्याबद्दलची माहिती असायला हवी.
114
संरक्षण मंत्रालयात शस्त्रास्त्र घोटाळ्याची चौकशी
जॉर्ज फर्नांडिस यांनी डॅनेलबरोबर शस्त्रास्त्र व्यवहाराच्या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि ह्या करारातील नियमबाह्यतेबाबतच्या चौकशीच्या मागण्या प्रणव मुखर्जी यांनी केल्या आहेत.
माजी मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वाक्षरी केलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या डॅनेल कंपनीबरोबर शस्त्रास्त्र व्यवहाराच्या कराराची माहिती प्रस्तुत आहे.
संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांची ह्या करारासंबंधीच्या संपूर्ण माहितीची आणि शस्त्रास्त्र खरेदीच्या चौकशीची मागणीसुद्धा प्रस्तुत आहे.
115
वाराणसीत बॉम्बस्फोटांची मालिका
बॉम्बस्फोटांच्या मालिकेची परिणती संकटमोचन मंदिरातील बळींमध्ये
प्रस्तुत कागदपत्रात वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेबाबतची संपूर्ण माहिती असावी, पहिला बाँबस्फोट हा बनारस हिंदू विद्यापीठाजवळच्या गर्दी असलेल्या संकटमोचन मंदिरात झाला आणि त्यात अनेक जण दगावले/जखमी झाले आहेत.
116
एन्काऊंटर विशेषज्ञ दया नायक
अवाजवी संपत्ती(डीए) खटल्यात दया नायक ह्यांच्या विरूद्ध एसीबीने कोणती पाऊले उचलली आहेत?
संबंधित कागदपत्रात एन्काऊंटर विशेषज्ञ दया नायक ह्याच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी विभागाने उचललेली पाऊले/ नोंदविलेले गुन्हे ह्याबाबतची विशिष्ट बातमी समाविष्ट असायला हवी. त्याची पत्नी आणि सहकारी ह्यांच्याविषयीची माहिती असंबद्ध आहे.
117
कलिंगनगरातील जमिनीबाबतचा वाद
कलिंगनगरातील जमिनीच्या ताब्याबाबतच्या वादावर आदिवासींतर्फे ठेवण्यात आलेला चर्चेचा प्रस्ताव आणि उडीसा सरकारचे केंद्राच्या मध्यस्थीसाठीचे आवाहन
कलिंगनगरातील जमिनीच्या ताब्याबाबतचा वाद सोडविण्यासाठी आदिवासींनी उडीसा सरकारकडे बैठकीची विनंती केली आहे. उडीसा राज्य सरकारने ह्या मुद्यावर केंद्राच्या मध्यस्थीसाठी विचारणा केली आहे. संबंधित कागदपत्रात ह्या चळवळीसंदर्भातील माहिती समाविष्ट असायला हवी. ह्या बैठकीव्यतिरिक्त इतर माहिती असंबधित आहे.
118
अयोध्येत अतिरेक्यांचे आक्रमण
अयोध्येतील आक्रमणामागे पाकिस्तानी अतिरेकी गटांचा संभाव्य सहभाग आणि ह्या हल्ल्याचे परिणाम
संबंधित कागदपत्रात ह्यापैकी एक किंवा अधिक विषयांवरील माहिती असायला हवी- पिडितांपर्यंत पोहोचणे, ह्या हल्ल्यानंतर राजकीय बंद, आक्रमणामागे पाकिस्तानी अतिरेकी गटांचा संभाव्य सहभाग, भाजपने धार्मिक विश्वासावर आक्रमण अशी ह्या घटनेची केलेली नोंद इत्यादी.
119
ताजमहालाबाबतचे वाद
ताजमहालाबाबतचा वाद सुरू
ताजमहाल ही वक्फ मालमत्ता आहे का? उत्तर प्रदेशाच्या सुन्नी वक्फ मंडळाने केलेल्या दाव्याला आधार देणारा कोणता पुरावा आहे?
भारतीय पुरात्त्वशास्त्रीय सर्वेक्षण आधारभूत पुराव्याच्या करत असलेल्या मागणीविषयीची माहिती संबंधित आहे. ताज महालाचे खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नाविषयीची कोणतीही माहिती ही देखील संबंधित आहे.
120
अनरा गुप्ता हिचा अश्लिल सीडी प्रकरणातील सहभाग
पूर्व मिस जम्मू असलेल्या अनरा गुप्तावर अश्लिल सीडी प्रकरणातील तिच्या सहभागाबद्दल गुन्हा दाखल आणि आंध्रप्रदेशातील न्यायिक प्रयोगशाळेने ह्या संदर्भात अहवाल दिला आहे.
अनरा गुप्ता हिला अश्लिल सीडी प्रकरणातील सहभागाच्या आरोपावरून अटक झाली होती. परंतू आंध्रप्रदेशातील न्यायिक प्रयोगशाळेने ह्या संदर्भात दिलेल्या अहवालात हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. संबंधित कागदपत्रात ह्या आरोपाविषयी किंवा आंध्रप्रदेशातील न्यायिक प्रयोगशाळेच्या अहवालाविषयी माहिती असायला हवी.
121
समझौता एक्सप्रेसमध्ये स्फोट
समझौता एक्सप्रेसमध्ये भयंकर विस्फोट
संबंधित कागदपत्रात समझौता एक्सप्रेसमध्ये झालेला विस्फोट आणि विस्फोटातील बळी ह्याविषयीची माहिती असायला हवी.
122
संजय दत्तचे आत्मसमर्पण
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी, अभिनेता संजय दत्त ह्याचे आत्मसमर्पण
संबंधित कागदपत्रात १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी, अभिनेता संजय दत्त ह्याचे आत्मसमर्पण ह्याविषयीची माहिती असावी. न्यायालयाने ह्या आत्मसमर्पणासाठी संजय दत ह्याला घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेविषयीची माहितीदेखील संबंधित आहे.
123
यासिर अराफतचा मृत्यू
पॅलेस्टियायी नेता यासिर अराफतचा मृत्यू
संबंधित कागदपत्रात पॅलेस्टियायी नेता यासिर अरफात ह्याच्या मृत्यूविषयीची माहिती समाविष्ट असावी. पॅलेस्टिनमधील राजकीय अनिश्चितता किंवा अस्थैर्य यासंबंधीची माहिती असंबंद्ध आहे.
124
भारतातील विविध राज्यांत अवैध औषधांची विक्री
भारतातील विविध राज्यांत अवैध औषधांचा व्यापार
संबंधित कागदपत्रात अवैध औषधे विकली जाणारी भारतातील विविध ठिकाणे नमूद केली गेली पाहिजेत. काही विशिष्ट राज्यांची नावे विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखी आहेत.
125
लाल मशीदीवरील हल्ला
इस्लामाबादमधील रूढीवादी विद्यार्थ्यांनी लाल मशीदीला घातलेला घेराव
संबंधित कागदपत्रात खालीलपैंकी एक किंवा अधिक विषयांवरील माहिती असावी :
लाल मशीदीच्या प्रमुख इमामास अटक, त्याच्या मुक्ततेसाठी रूढीवादी विद्यार्थ्यांनी लाल मशीदीला घातलेला घेराव आणि पोलिस व विद्यार्थी ह्यांमधील तंटा